Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : सरकार स्थापनेच्या मु्द्यावरून तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष , संकल्पित तालिबानचा भावी प्रमुख मुल्ला बरादर जखमी

Spread the love

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असला तरी सरकार स्थापनेच्या मु्द्यावरून तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला आहे. यावरून तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या नेत्यांमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार सरकार स्थापनेवरून अनस हक्कानी व खलील हक्कानी यांची मुल्ला बरादर आणि मुल्ला याकूब यांच्यासोबत संघर्ष झाला असल्याचा दावा करण्यात येत असून या संघर्षा दरम्यान हक्कानी गटाकडून झालेल्या गोळीबारात मुल्ला बरादर जखमी झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

नव्या संकल्पित सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कने मोठी जबाबदारी मागितली आहे. त्यांना संरक्षण खातेदेखील हवे आहे. तर, तालिबानने हक्कानी नेटवर्कच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिला. या दरम्यान हक्कानी आणि बरादर गटामध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त पंजशीर ऑब्जर्वर आणि पंजशीर बंडखोरांच्या एनएफआरने दिले आहे. या गोळीबारात बरादर जखमी झाला आहे.मात्र, या गोळीबाराच्या दाव्याला अद्याप कोणीही दुजोरा दिला नाही. बरादरवर पाकिस्तानमध्ये उपचार सुरू असल्याने अफगाणिस्तानमधील सरकार स्थापन करणे टाळले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

पाकिस्तान हक्कानींच्या बाजूने

दरम्यान पाकिस्तानकडून हक्कानी नेटवर्कला झुकते माप दिले जात असल्याची चर्चा आहे. तालिबानच्या सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कला महत्त्वाची जबाबदारी मिळावी असे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. तालिबान सरकार स्थापन करण्यासाठी असलेले मतभेद दूर करण्यासाठी पाकिस्तान आयएसआय प्रमुखांनी अफगाणिस्तानचा दौरा केला असल्याचे म्हटले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!