Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात कोरोनाबाधितांची संख्या पाचव्या दिवशीही ४० हजारांहून अधिक !!

Spread the love

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाहे .आज सलग ५ व्या दिवशी देशात गेल्या २४ तासांत ४२, ७६६ नवीन रुग्ण आढळून आले असून ३०९ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात करोनाने ४,४०,५३३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.. देशात सध्या करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही पुन्हा ४ लाखांवर म्हणजे ४, १०,०८४ इतकी झाली आहे. तर कोरोनातून बरे होण्याचा दर हा ९७.४२ टक्के इतका आहे.

दरम्यान केरळमध्ये गेल्या २४ तासांत २९, ६८२ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून १४२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. दुसरीकडे केरळच्या कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसच्या पहिल्या रुग्णाचीही नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एनसीडीसीची एक टीम केरळ रवाना करण्यात आली असून ही टीम राज्याला तांत्रिक मदत करणार आहे. निपाह व्हायरसमुळे राज्यात १२ वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात शनिवारी करोनाचे ४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले. तर ६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!