BeedNewsUpdate : बहुचर्चित करुणा शर्मा परळीत दाखल , गाडीत पिस्तूल आढळल्यानंतर मुंडे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी

Advertisements
Advertisements
Spread the love

बीड : राज्याचे  मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या करुणा  शर्मा या आज बीडमध्ये दाखल झाल्या आहेत.  दरम्यान त्यांच्या गाडीच्या तपासणीत  पोलिसांना पिस्तूल आढळून आल्याने खळबळ उडाली असून त्यांच्या विरोधात मुंडे समर्थकांची घोषणाबाजी सुरु आहे. त्यामुळे परळीत  तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  त्यांच्या गाडीत आढळून आलेले हे पिस्तूल त्यांचेच आहे का ? आणि असल्यास त्यांच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना आहे का ? याचा पोलीस शोध घेत आहेत. 

Advertisements

करुणा शर्मा यांनी फेसबुक लाइव्हमधून आपण ५ सप्टेंबर रोजी परळीत जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे म्हटले होते . त्यावर धनंजय मुंडे यांनी त्यांना कोणतीही पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करणारी नोटीस पाठवली असून प्रसार माध्यमांनाही हे सर्व प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यांनी दिलेली कोणतीही माहिती प्रसिद्ध करू नये असे पत्र त्यांच्या वकिलामार्फत पाठवले आहे . दरम्यान परळीत दाखल झाल्यानंतर करुणा शर्मा वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवले . तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत जोरदार घोषणाबाजी केली.

Advertisements
Advertisements

दरम्यान मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा मुंडे म्हटलं कि , मला गावात यायला का अडवता? असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली. यामुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले आहे. सध्या परळी मध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस निदर्शकांना आवरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे.

आपलं सरकार