BeedNewsUpdate : करुणा शर्मा यांना अखेर परळीत अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत करुणा शर्मा यांनी पाय ठेवताच त्यांच्याविरुद्ध मुंडे समर्थकांनी मोठा गोंधळ केला. दरम्यान त्यांच्या गाडीच्या तपासणीत गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आली असा आरोप करुणा शर्मा यांनी केली आहे.

Advertisements

करुणा शर्मा यांनी फेसबुक लाइव्हमधून आपण ५ सप्टेंबर रोजी परळीत जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे म्हटले होते . त्यावर धनंजय मुंडे यांनी त्यांना कोणतीही पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करणारी नोटीस पाठवली असून प्रसार माध्यमांनाही हे सर्व प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यांनी दिलेली कोणतीही माहिती प्रसिद्ध करू नये असे पत्र त्यांच्या वकिलामार्फत पाठवले आहे . दरम्यान परळीत दाखल झाल्यानंतर करुणा शर्मा वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवले . तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत जोरदार घोषणाबाजी केली. या नंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तुल आढळून आली, यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

Advertisements
Advertisements

करुणा शर्मा यांच्या परळी प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मंदिराच्या समोर करुणा शर्मा यांना जमावाने अडवले होते. पोलिसांनी करुणा शर्मा यांनी , धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आणि धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला असल्याचा आरोप केला आहे.

शर्मा – मुंडे वादाची पार्श्वभूमी

करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच ट्विट करत तक्रारीची कॉपी पोस्ट केली होती. यावेळी रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप केले होते, यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध व प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली तसंच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत. या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन आपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते.

काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण तीन चार महिने शांत झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या सोबत घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा शर्मा या संपत्ती पासून सामाजिक आणि राजकीय विषयावर ती कायम भाष्य करत होत्या. तसेच फेसबुक लाईव्ह करत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मी परळीमध्ये येणार आहे तसेच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असं सांगितल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

आपलं सरकार