Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : अफगाणिस्तानात तालिबानचा इराणच्या धर्तीवर सरकार , आज घोषणेची शक्यता

Spread the love

पेशावर : इराणी नेतृत्वाच्या धर्तीवर तालिबानच्या अफगाणिस्तानातील नवीन सरकारची स्थापना आज काबूलमध्ये करण्यात येत असल्याची माहिती तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सांगितले आहे. कतारमधील दोहा येथे असलेल्या राजकीय कार्यालयाचे अध्यक्ष मुल्ला अब्दुल घनी बरादर हे तालिबानी सरकारचे नेतृत्व करणार असून तालिबान तालिबानचे नेते मुल्ला हैबतुल्ला अखुंडजादा हे अफगाणिस्तानचे सर्वोच्च अधिकारी असतील, असे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.


दरम्यान याबाबत माहिती देताना तालिबानच्या सांस्कृतिक व माहिती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी मुफ्ती इनामुल्ला समनगानी यांनी म्हटले आहे, की मंत्रिमंडळ स्थापनेबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे.इराणमध्ये सर्वोच्च राजकीय व धार्मिक पदावर एका सर्वोच्च व्यक्तीची नेमणूक केली जाते. त्याप्रमाणेच व्यवस्था अफगाणिस्तानात राहणार आहे. त्या व्यक्तीचे स्थान हे अध्यक्षांच्या वरचे असणार असून तेच लष्कर, सरकार व न्यायालयांचे प्रमुख नेमण्याचे काम करतील. सर्वोच्च नेत्यांचा शब्द राजकीय, धार्मिक व लष्करी कामकाजात अंतिम असेल.

मुल्ला अखुंडजादा हे सरकारचे नेते असतील व त्यांच्या प्रमुखपदाबाबत कुठलाही प्रश्न नाही. अखुंडजादा हे तालिबानचे जुने धार्मिक नेते आहेत. यांनी गेली १५ वर्षे बलुचिस्तानातील कचलाक भागात एका मशिदीत सेवा केली आहे. नवीन प्रशासन प्रणाली, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येत आहे.
समनगानी यांनी म्हटले आहे,की नव्या सरकारी रचनेत गव्हर्नरांच्या हाती प्रांतांचे नियंत्रण राहील, जिल्हा गव्हर्नर हे संबंधित जिल्ह्यांचे प्रमुख सूत्रधार असतील. तालिबानने गव्हर्नर, पोलिस प्रमुख, पोलिस कमांडर्स यांची प्रांत व जिल्ह्यांमध्ये नेमणूक केली आहे.

पंजशीरबाबत उलट सुलट दावे

शुक्रवारी तालिबानने पंजशीरवरही कब्जा केल्याचे सांगण्यात येत असले तरी या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान पंजशीरमध्ये अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली तालिबानवर कारवाई सुरू आहे. या भागात मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, तालिबानने आता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. या रिपोर्टमध्ये तालिबानच्या तीन सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे. तालिबानचा एक कमांडर म्हणाला, “अल्लाहच्या कृपेने आम्ही संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. अडचणी निर्माण करणाऱ्यांचा पराभव झाला असून पंजशीर आमच्या ताब्यात आहेत.’

दरम्यान, माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडल्याचे वृत्त येत आहे. मात्र, रिपोर्टनुसार, अमरुल्लाह सालेह यांनी हे वृत्त फेटाळले. अमरुल्लाह सालेह यांनी टोलो न्यूजला सांगितले की, देश सोडून पळून गेल्याचे वृत्त खोटे आहे. बीबीसी वर्ल्डच्या पत्रकाराने ट्विटरवर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ अमरुल्लाह सालेह यांनी पाठवल्याचे सांगण्यात आले.

या व्हिडिओमध्ये म्हणाले की, ‘आम्ही कठीण परिस्थितीत आहोत यात शंका नाही. आमच्यावर तालिबानने हल्ला केला आहे… आम्ही त्यांच्याशी लढाई करत आहोत.’ याचबरोबर, अमरुल्लाह सालेह यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रतिकार चालू आहे आणि चालू राहील. मी माझ्या मातीसह इथे आहे, माझ्या मातीसाठी उभा आहे आणि त्याच्या सन्मानाचे रक्षण करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!