Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

TokiyoParalympicUpdate: भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट , ४ सुवर्णासह एकूण १७ पदकांची कमाई !!

Spread the love

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. पुरुषांच्या एसएल ३ प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खेळाडूंचे ट्विद्वारे अभिनंदन केले आहे.

दरम्यान पुरुष एकेरीच्या एसएल ४ प्रकारात, सुहास यथिराजने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे.प्रमोदपूर्वी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी पी ४ मिश्रित ५० मीटर पिस्तूल एसएच १ नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले. १९ वर्षीय नरवालने २१८.२ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे.

दुसरीकडे, मंगळवारी कांस्य जिंकणाऱ्या सिंहराजने आज २१६.७ गुणांसह रौप्यपदक जिंकले. रशियन ऑलिम्पिक समितीचे सेर्गेई मालिशेव यांनी १९६.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. यापूर्वी पात्रता फेरीत सिंहराज अधाना ५३६ गुणांसह चौथ्या आणि नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आता भारताच्या खेळाडूंनी एकूण १७ पदके कमावाली आहेत. त्यात ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्यपदकांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!