Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : सावधान : मास्क काढलेल्या इस्राईलमध्ये कोरोनामुळे होते आहे परिस्थिती चिंताजनक !!

Spread the love

जेरुसलेम : गेल्या काही दिवसात इस्राईलमध्ये १० लाख लोकसंख्येमागे १ हजार ८९२ जणांना कोरोनाबाधित होत असल्याचे वृत्त असून ऑगस्टच्या मध्यापासून या देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वाधिक लसीकरण असलेला देश आहे. इस्रायलमध्ये जुलैपासून ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस दिले जात असून लसीकरणामुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान कोरोनाला सामोरे जाण्यासाठी, इस्रायलमधील नागरिकांवर कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. ज्या लोकांना लसीचा तिसरा डोस मिळाला नाही, त्यांना प्रवास, बारमध्ये जाणे, बाहेर खाणे आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापासून रोखले जात आहे. इस्रायली नागरिकांना त्यांच्या दुसऱ्या डोसच्या सहा महिन्यांच्या आत फायझर-बायोटेक लसीचा तिसरा डोस घेणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.

मध्यंतरीच्या काळात इस्रायलमध्ये लसीकरणाच्या जोरावर करोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यात आला होता. त्यामुळे इस्रायलमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कवरील बंधने शिथिल करण्यात आली होती. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता कोरोना रुग्ण वाढत असल्याने मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासोबत देशात विदेशी पर्यटकांची लसीकरण मोहिम ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!