Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : याला म्हणतात पंतप्रधान , कोरोना कमी होत नाही म्हणून केली राजीनाम्याची घोषणा !!

Spread the love

टोकियो: कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे निर्माण होत असलेल्या असंतोषाची दाखल घेऊन जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. तसेच सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आपण यापुढे उमेदवारी जाहीर करणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. मागील वर्षी शिंजो आबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर योशिहिदे सुगा यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.


दरम्यान सुगा यांनी शुक्रवारी, सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांना आपण पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे जाहीर केले आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत. सुगा यांच्या भूमिकेमुळे ते पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ते पंतप्रधानपदी कायम असणार आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केल्याबद्दल सुगा यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर सुगा यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. जपानमध्ये करोना संसर्गामुळे आणीबाणी लागू केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या १५ लाखांहून अधिक आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!