Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCrimeUpdate : ५ लाखासाठी “त्याने” स्वतःच्या आई -बाबासह बहीण -आजीलाही संपवले !!

Spread the love

रोहतक : पाच लाखासाठी मुलानेच आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवल्याची धक्कादायक घटना हरियाणाच्या रोहतकमध्ये घडल्याचे धक्कादायक वृत्त आहे. हे वृत्त समजताच संपूर्ण शहर हादरले आहे. पोलिसांनी याप्रकरणी २० वर्षीय मुलाला अटक केली आहे. या मुळावरच आपले वडील, आई, बहिण आणि आजीची हत्या केल्याचा आरोप आहे.

रोहटकच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्टला मुलाने गोळ्या घालून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर पोलिसांसमोर धाय मोकलून रडणारा मुलगाच आरोपी असल्याचे समजल्यानंतर शेजाऱ्यांसह नातेवाईकांनाही धक्का बसला आहे. रोहतक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभी त्यांना हि हत्या व्यावसायिक शत्रुत्वातून हत्या झाल्याचा संशय होता. मात्र मुलगा वारंवार आपला जबाब बदलत असल्याने त्यांना संशय आला. आरोपी मुलाचे वडील प्रॉपर्टी डीलर आणि पहिलवान होते. यानंतर पोलिसांनी आरोपी अभिषेकला मंगळवारी संध्याकाळी ताब्यात घेतलं आणि चौकशी केली.

याबाबत  बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले कि , जिल्हा चौकशीदरम्यान अभिषेनकने हत्येची कबुली दिली. मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही पुढील तपासासाठी त्याला रिमांडमध्ये घेतले आहे. तपासादरम्यान आई, वडील, बहिण आणि आजीची हत्या केल्यानंतर मुलगा मित्रांसोबत हाय-एण्ड हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता अशी माहिती मिळाली आहे.

“मुलाने आम्हाला सांगितले की, मित्रांसोबत पार्टी करत असताना कुटुंबीयांची हत्या केली असल्याने आपलं त्यात मन लागत नव्हते. आपल्याला पोलिसांना शरण जायचं होते पण भीती वाटत होती असंही त्याने म्हटलं,” असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पार्टीमधून परतल्यानंतर आपल्या मामाला फओन करुन दरवाजा आतून बंद असून कोणीही उघडत नव्हतं असं सांगितलं. आपण दरवाजा तोडून बहिणीला घेऊन रुग्णालय गाठल्याचा दावा त्याने केला.

दरम्यान मुलाने दिलेल्या माहितीनुसार, पालकांनी पाच लाख रुपये देण्यास नकार दिल्याने चीड आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, “आरोपींनी पालकांकडे पाच लाखांची मागणी केली होती. पण त्याचं कारण सांगत नसल्याने आई, वडील आणि आजीने त्याला सुनावलं होतं. यामुळे संतापाच्या भरात त्याने हत्येचं पाऊल उचललं”. त्याला या प्रकरणात आणखी कोणी मदत केली याप्रकरणी अधिक तपास चालू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!