Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यातील कोरोनाची स्थिती दिलासादायक, जाणून घ्या आजची ताजी स्थिती

Spread the love

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार ३१३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार ३४२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ४ हजार ३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ७५५ इतकी होती. तर, आज ९२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ५५ इतकी होती. दरम्यान आज राज्यात झालेल्या ९२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८६ हजार ३४५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.

राज्याच्या सक्रिय रुग्णसंख्येत किंचित घट

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ४६६ वर आली आहे. काल ही संख्या ५० हजार ६०७ वर होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा वाढून तो १४ हजार ९७३ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यातही ही संख्या वाढून ती ७ हजार १०३ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६ हजार ००७ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ९३७ वर घसरली आहे. तर, सांगलीत एकूण ३ हजार २४४ इतकी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६७६ वर खाली आली आहे. मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ती ३ हजार ८४५ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०५४, सिंधुदुर्गात ९०२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७१७ इतकी आहे.

वाशिम जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४३८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६४ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९४ वर खाली आली आहे. तर राज्यात सर्वात कमी रुग्णसंख्या वाशिम जिल्हयात आहे. येथे फक्त १ सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४४ लाख ८७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७७ हजार ९८७ (११.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार ०९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, १ हजार ९५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात १८ नवे रुग्ण , दोन मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज २१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष ४४ हजार ३८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण १८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ४८ हजार १४१ झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ५३६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. दरम्यान आज जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!