Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : जेईई मेन्स परीक्षा घोटाळा , सीबीआयच्या छापेमारीत ७ जणांना अटक

Spread the love

पुणे : जेईई मेन्स परीक्षेमध्ये मोठी अनियमितता आढळून आली आहे. या परीक्षेच्या चौथ्या सत्राच्या चौकशीनंतर सीबीआयने केलेल्या छापेमारीत तब्बल ७ जणांना ताब्यात घेतले आहे. दिनांक २६ , २७ आणि ३१ ऑगस्ट आणि १, २ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये ही अनियमितता आढळून आली आहे. बारावीनंतर तंत्रशिक्षणात पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणयासाठी जेईई मेन्स ही परीक्षा द्यावी लागते.

सीबीआयने आज पुणे , दिल्ली आणि एनसीआरच्या काही भागांमध्ये हि छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये सीबीआयने ७ जणांना ताब्यात घेतले आहे. परीक्षेमध्ये अनियमितता आणण्यासाठी उमेदवारांकडून तब्बल १५ लाख रुपये घेण्याच्या आरोपाखाली या ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

खाजगी शिक्षण संस्था आणि त्याच्या संचालकांकडून चालू असलेल्या जेईई मेन्स २०२१ परीक्षेमध्ये अनियमिततेशी संबंधित या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआयने आज पुणे, दिल्ली, जमशेदपूर यांसह देशभरातील विविध शहरांमधील तब्बल वीस जागांवर छापेमारी केली.या शिक्षण संस्थेचे कर्मचारी आणि केंद्र सरकारचे कर्मचारी हे या परीक्षेमध्ये अनियमितता आणण्यासाठी मदत करत होते. या प्रकरणात एक कंपनी, संचालक आणि तीन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!