Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsAlert : ‘इसिस खुरासान’कडून भारतात दहशतवादी कारवायांच्या हालचाली

Spread the love

नवी दिल्ली : ‘इसिस खुरासान’कडून (ISIS-K) या दहशतवादी संघटनेकडून भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचे गुप्तचर यंत्रणेने कळवले आहे. अफगाणिस्तानात तालिबानने वर्चस्व मिळवल्यानंतर भारताच्या उत्तरेकडील बाजूस दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

या बाबत गुप्तचर यंत्रणांकडून दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट दिला असून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना इसिसचे प्रशिक्षित घुसखोर – दहशतवादी भारतात स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांच्या निशाण्यावर भारतातील मंदिरं, काही राजकीय नेते , गर्दीची ठिकाणं आणि देशातील परदेशी व्यक्तींनाही टार्गेट केलं जाऊ शकतं. या दहशतवादी गटासाठी काम करणाऱ्या काही व्यक्तींना कर्नाटक आणि काश्मीरमध्ये नुकतीच अटक करण्यात आली आहे. चौकशीनंतर ते अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील आयएस ऑपरेटरच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे.

भारतमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांसाठी आयईडी बनवण्याचे तसेच छोटी हत्यारे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत पोहचवण्यासाठी इसिसकडून प्रयत्न सुरू आहे. असलम फारुकी हा ‘इसिस खुरासान’ (ISIS-K) या नावानं ओळखल्या जाणाऱ्या दहशतवादी गटाचा म्होरक्या आहे. फारुकी हा पाकिस्तानच्या खैबरपख्तूनख्वा प्रांताचा रहिवासी आहे. तसेच तो ‘लष्कर ए तोयबा’शीही निगडीत आहे. फारुकी आतापर्यंत अफगाणिस्तानातील बगराम तुरुंगात बंद होता. तालिबान्यांनी काबूलवर वर्चस्व मिळवल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लगेचच त्याने काबूल विमानतळावर आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे म्हटले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!