Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : सणाच्या निमित्ताने बाहेर पडताय ? मग केंद्र सरकारचे हे वाहन नक्की वाचा…

Spread the love

नवी दिल्ली : देशातील सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्याने जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे , असे आवाहन केंद्रसरकारच्या वतीने करण्यात आले आहे. सणावारामुळे लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे आधीच देशात असलेली कोरोनाची लाट , आगामी तिसऱ्या लाटेचे संकट, त्यात कोरोनाचे सतत रूप बदलणारे अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट यामुळे या कालावधीत आणि लोकांच्या आरोग्यावर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार ४२ जिल्ह्यांमध्ये दररोज १०० पेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहे. ३८ जिल्ह्यांचा वीकली पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्क्यांच्या मध्ये आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोना परिस्थितीबाबत पत्रकार परिषद घेऊन इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ. बलराम भार्गवा यांनी सांगितले कि , जर एकत्र जमणे गरजेचेच असेल तर पूर्ण लसीकरण आवश्यक आहे. म्हणजे लोकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले असायला हवेत तसेच लसीकरणानंतरही मास्क घालणे आणि कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे.

सध्या देशात फक्त १६ टक्के लोकांचे पूर्ण तर ५४ टक्के टक्के लोकांचे अंशत: लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे सिक्कीम, दादरा-नगर हवेली आणि हिमाचल प्रदेश ३ राज्यांमध्ये १०० टक्के लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. या राज्यातील १०० टक्के १८+ नागरिकांना कोरेना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. ⁦

दरम्यान गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोनाची काळजी घेत सण, उत्सव साजरे करण्याची गरज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना लशीचा दुसरा डोस घ्यायलाच हवा कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेक प्रेग्नंट महिलांनी कोरोना लस घेतलेली नाही. त्यांनी पुढे घेऊन लस घ्यावी. कोरोना लस त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बाळासाठी खूप महत्त्वाची आहे, असेही डॉ. पॉल यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!