AurangabadNewsUpdate : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, सावत्र बाप आणि मानलेल्या भावाला बेड्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – पोक्सोच्या दोन गुन्ह्यात पुंडलिकनगर पोलिसांनी रमानगरातून बाप आणि राजेशनगर बीड बायपास मधून मानलेल्या भावाला बेड्या ठोकल्या. कमलेश जगन मते रा.रमानगर धंदा सुतार असे सावत्र बापाचे नाव आहे. त्याने आज दुपारी अडीच वा.घरातच मुलीवर अत्याचार केला. तर दुसर्‍या प्रकरणात मुंबईतील रबाले पोलिसांकडील रेकाॅर्डवरचा गुन्हेगार रामप्रसाद उर्फ पल्ल्यादादा (२३) रा.फुलंब्री मारसावळा याने ३१ आॅगस्ट रोजी आई वडिल नसलेल्या १३ वर्षीय मुलीला राजेशनगर बीडबायपास येथे मित्राच्या खोलीवर नेत ३१आॅगस्ट रोजी रविवारी सकाळी ८वा. अत्याचार केला.

Advertisements

पिडीता व तिची मोठी बहीण या दोघींशी आरोपी रामप्रसाद याची जुनी ओळख असून त्या दोघींना तो बहीण मानत होता. पीडितेची मोठी बहीण ही खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. राखी पोर्णिमेला राखी बांधल्यानंतर १३ वर्षीय पिडीतेला थापा मारुन रविवारी सकाळी ८वा.राजेशनगरातील मित्राच्या खोलीवर नेऊन तिथे अत्याचार करुन घरी उस्मानपुर्‍यात आणून सोडले. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मीरा चव्हाण व एपीआय खटाने करंत आहेत.

Advertisements
Advertisements

एक दिवसाच्या अपत्याला सोडून आई फरार

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात प्रसुती विभागात ३०आॅस्ट रोजी सकाळी ९ते ५वाजेच्या दरम्यान एक दिवसाच्या बाळाला सोडून पळाली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात आज दुपारी २.३०वा. गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विशाल बोडखे तपास करंत आहेत.

आपलं सरकार