Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : मराठा आरक्षणासाठी खा . संभाजी राजे घेणार उद्या राष्ट्रपतींची भेट

Spread the love

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील खासदार गुरूवार २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे. या भेटीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींकडे वेळ मागितली होती. तसेच महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केले होते.

खासदार संभाजीराजे यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे हे सुरूवातीपासूनच मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय असून रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वपक्षीय खासदारांना एकत्र करत राष्ट्रपतींची भेट घेण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!