Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : ६५ किलोमीटर पाठलाग करंत कार चोरट्यासहित जप्त

Spread the love

औरंगाबाद – कार खरेदीचा बहाणा करंत ट्रायल ला घेऊन गेलेली कार पळवून नेणार्‍या दोन भामट्यांना जिन्सी आणि गुन्हेशाखा पोलिसांनी ६५किमी पाठलाग करंत जेरबंद करंत जिन्सी पोलिसांच्या हवाली केले. फैसल पिता रफीक सय्यद(२४) रा.रहेमानिया काॅलनी व सय्यद अरबाज सय्यद आरेफ रा.रोशन गेट अशी अटक आरोपींची नावे आहेत. नारेगावातील इसमाचे थकलेले पैसे देण्यासाठी कार चोरी केल्याची कबुली चोरट्यांनी दिली.

आज दुपारी १२.३०च्या सुमारास वरील आरोपी फिर्यादी अर्जून ढवळे(३७) यांच्या वैष्णवी कार याजुने कार विक्री केंद्रावर आले.त्यांनी कार खरेदी करायची आहे तेंव्हा ट्रायल घेण्यासाठी ढवळे यांना विचारले ढवळे यांनी दुकानावरील मुलाला सोबंत देत आरोपी फैजल व अरबाज यांना कार ट्रायल घेण्यासाठी दिली. पण रस्त्यात ढवळे यांच्या माणसाला चाकुचा धाक दाखवून खाली उतरवले व कार घेत पसार झाले.घडलेला प्रकार जिन्सी कळल्यानंतर पीएसआय गोकुळ ठाकुर यांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटिव्ही फुटेज तपासले.

दरम्यान पोलिसनिरीक्षक व्यंकटेश केंद्रे आणि अविनाश आघाव दोघेही पोलिसआयुक्तालयात असतांना पीएसआय ठाकूर यांनी घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिस निरीक्षक केंद्रे यांना दिली. त्याच प्रमाणे गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक आघाव यांनी पीएसआय दत्ता शेळके यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तपासासाठी रवाना केले.स्मार्टसिटी सीसीटिव्ही च्या माध्यमातून कारचे लोकेशन पोलिस घेत होते.त्यानुसार पीएसआय शेळके आणि ठाकूर यांनी सिनेस्टाईल चोरलेल्या कारचा ६५किमी पाठलाग केला.

शेवटी आरोपी कार चोरुन नेतांना गोंधळल्यामुळे रस्त्यालगत कार शेतात घुसवली तेवढ्याच तत्परतेने पीएसआय ठाकूर आणि शेळके यांच्या पथकाने चोरटे पकडले.वरील कारवाई पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता, पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे , सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र साळखे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे , निरीक्षक अविनाश आघाव, पीएसआय दत्ता शेळके, गोकुळ ठाकूर, एएसआय नंदकुमार भंडारे,किरण गावंडे, ओमप्रकाश बनकर, संजय राजपूत यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!