Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : तब्ब्ल २० वर्षाच्या संघर्षाला पूर्णविराम देत अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडला

Spread the love

वॉशिंग्टन : अखेर अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य पूर्णतः माघारी परतले असल्याचे वृत्त असून या निमित्ताने गेल्या २० वर्षांपासून येथे सुरु असणारा अमेरिकेचा संघर्ष संपल्याची घोषणा करण्यात आली आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन कमांडर आणि अमेरिकन राजदूत हे अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन नागरिक ठरले.

मात्र त्याचवेळी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने अपेक्षित संख्येने लोकांची सुटका करता आली नसल्याची कबुली दिली आहे. तर जनरल केंथ मॅकन्झी यांनी संपूर्ण सैन्य मागे घेतल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आज याबाबत अमेरिकेला संबोधित करणार आहेत.

अमेरिकन सैन्याच्या माघारीबाबत केंथ मॅकन्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार हमीद करझाई विमानतळावरुन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी (अमेरिकन वेळेप्रमाणे) अमेरिकेच्या सी -१७ या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण केले. “अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य पूर्णपणे मागे घेण्यात आल्याची मी घोषणा करतो. अमेरिकन नागरिक आणि अफगाणिस्तानी लोकांना वाचवण्यासाठी अमेरिकन लष्कराने सुरु केलेले मदतकार्य पूर्ण झाले असले तरी राजनैतिक पद्धतीने अमेरिकन आणि अफगाणी नागरिकांना मदत करणे आम्ही सुरुच ठेवणार असल्याचेही मेकन्झी यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी “अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तान सोडल्याच्या बातमीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली. “अफगाणिस्तानमध्ये मागील २० वर्षांपासून असणारी आमच्या सैन्याची उपस्थिती संपुष्टात आली. यासाठी मी आमच्या लष्कराच्या कमांडर्सचे आभार मानू इच्छितो की त्यांनी इतक्या धोकादायक वातावरणामध्ये अफगाणिस्तानमधून नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ३१ ऑगस्टच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये संपूर्ण लष्कर मागे घेतलं आणि त्यात अमेरिकन नागरिकांना प्राण गमावावे लागले नाहीत,” असं म्हटलं आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये अमेरिकन लष्कराने अमेरिकन ऐतिहासामधील सर्वाधिक संख्येने म्हणजेच १ लाख २० हजार अमेरिकन नागरिक, अफगाणिस्तानमधील सहकारी आणि इतरांना एअरलिफ्ट केले असल्याची माहिती बायडेन यांनी दिली आहे.

अमेरिकचे संरक्षण विभागाने ही अफगाणिस्तान सोडणाऱ्या अमेरिकन लष्कराच्या शेवटच्या कमांडरचा फोटो ट्विट केलाय. मेजर जनरल क्रिस डोन्ह्यू हे ३० ऑगस्ट रोजी सी-१७ विमानामध्ये चढणारे आणि अफगाणिस्तान सोडणारे शेवटचे अमेरिकन लष्करी अधिकारी ठरले. यासोबतच अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील मोहीम संपुष्टात आली असल्याचे सांगण्यात आलं आहे.

तालिबान्यांचा आनंद सोहळा हवेत गोळीबार करीत उडवले फटाके

ठरल्याप्रमाणे शेवटचे अमेरिकन सैनिक बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य असलेला देश घोषित केला आहे. दरम्यान अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे मुक्त झाला आहे आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे, असे तालिबानने म्हटले आहे. अमेरिकन सैन्याचे शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला आहे. “अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ सोडले आहे आणि आपल्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे,” असे तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी सांगितले.

अमेरिकेने त्यांच्या अंतिम अंतिम मुदतीपूर्वी देश सोडला असल्याचे सांगितले आहे. अफगाणिस्तानात २० वर्षांच्या युद्धानंतर विजयाचा आनंद साजरा करताना तालिबान्यांनी फटाके फोडच आकाशात गोळीबार केला. तालिबान्यांनी शेवटचे अमेरिकन विमान सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास रात्रीच्या आकाशात पाहिल्यानंतर त्यांच्या हवेत गोळीबार केला आणि फटाके उडवले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!