Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : तालिबान आणि भारतीय राजदूताशी महत्वपूर्ण विषयावर चर्चा

Spread the love

दोहा : अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानने आपल्या राजकीय मुत्सदेगिरीला प्रारंभ केला असून या पार्श्वभूमीवर कतारच्या दोहामध्ये भारतीय राजदूताने तालिबान नेत्याची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. या भेटीत अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या देशात परत येण्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. तसेच, अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग हा भारताविरोधात वापरू नये, अशी भूमिका भारतीय राजदूतांनी मांडली.

यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, या तालिबानने या भेटीची मागणी केली होती. त्यानुसार दोहा येथील भारतीय दूतावासात दोन्ही प्रतिनिधींची भेट झाली. भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहामधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास यांची भेट घेतली.अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या मायदेशात परतण्याच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली. यावर तालिबानच्या प्रतिनिधीने आश्वासन दिले असून भारताचे सर्व मुद्दे सकारात्मक मार्गाने सोडवले जातील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

तालिबानचा वरिष्ठ नेता भारतात शिकलेला

दरम्यान तालिबानचा वरिष्ठ नेता शेह मोहम्मद अब्बास स्टेनकझई याने भारतासोबत तालिबानला चांगले संबंध हवे आहेत, असे म्हटलं होते. शेह मोहम्मद अब्बास यांनी डेहराडूनच्या इंडियन मिलिल्टी अकॅडमीत (IMA) मध्ये प्रशिक्षण घेतलेले आहे. तालिबानची भारतासोबत राजतैनिक, आर्थिक आणि सांस्कृतिकसंबंध कायम ठेवण्याची इच्छा आहे, असेही स्टेनकझाईने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!