Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पत्नीशी झालेल्या वादातून पतीने कापला स्वतःचा गळा

Spread the love

औरंगाबाद: मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका व्यक्तीने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदर व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भाऊसाहेब तुळशीराम काकडे असे या तरुणाचं नाव आहे. तो औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी आहे.३३ वर्षीय जखमी भाऊसाहेब काकडे याचं काही दिवसांपूर्वी राणी काकडे नावाच्या २३ वर्षीय युवतीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर पहिले सहा महिने दोघांत सर्वकाही अलबेल सुरू होतं. पण त्यानंतर काकडे दाम्पत्यांत छोट्या छोट्या कारणांतून वाद व्हायला सुरुवात झाली. कालांतरानं त्यांच्यातील वाद वाढतच गेले. एकमेंकासोबत सततच्या होणाऱ्या वादाला कंटाळून संबंधित दाम्पत्यानं सोमवारी घटनेच्या दिवशी बाँडवर घटस्फोट घेतला.

दरम्यान बाँडवर घटस्फोट घेतल्यानंतर दोघंही सोबत मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. याठिकाणी दोघांत पुन्हा वादाला सुरुवात झाली. यावेळी राग अनावर झाल्यानं भाऊसाहेब यानं धारदार शस्त्रानं स्वत: चा गळा चिरून घेतला आहे. या घटनेत भाऊसाहेब हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले कि , मध्यवर्ती बसस्थानकात एक जोडपं आलं होतं. या दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वादावादी सुरू होती.दरम्यान हा वाद वाढत गेल्यानंतर संबंधित व्यक्तीने रागाच्या भरात स्वतःचा गळा चिरला. या पुरुषासोबत असलेल्या महिलेने ही घटना पाहताच आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना मदतीसाठी बोलवले.

दरम्यान मध्यवर्ती बस स्थानकातील पोलीस व वाहतूक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जखमी व्यक्तीवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर जबाब घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती क्रांती चौक पोलिसांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!