AurangabadCrimeUpdate : जालन्यातला रेकाॅर्डवरचा गुन्हेगार वेदांतनगर पोलिसांच्या ताब्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मोटरसायकल चोरांकरता लावलेल्या सापळ्यात जालना पोलिसांना हवा असलेला आरोपी अलगद वेदांतनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विष्णू काशीनाथ घेंबड(३०) असे अटक रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो जालना शहराजवळील धारा गावात घरफोडी करुन रेल्वेस्टेशनवरील मनपाच्या निवारागृहात लपून बसला होता.

Advertisements

दरम्यान साध्या गणवेषात जिल्हा न्यायालयाच्या आवारात मोटरसायकल चोरांसाठी सापळा लावलेल्या पोलिसांना विष्णू घेंबड संशयित रित्या फिरतांना दिसला त्यास विश्वासात घेत विचारपूस केली असता तो मंठा पोलिसांचा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.तसेच विष्णू घेंबडने साथीदारासोबंत धारा मधे घरफोडी केल्यानंतर साथीदाराला जालना पोलिसांनी अटक केल्याचे कळताच विष्णू घेंबड ने शहरात येत निवारागृहात आसरा शोधला.वरील कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनगर पोलिसांनी पार पाडली. जालना परिसरात पुढील प्रक्रियेसाठी जालना पोलिस वेदांतनगर पोलिसांकडून हस्तांतरित करुन नेला आहे.

Advertisements
Advertisements

तीन दिवसात चोरीचा गुन्हा उघडकीस

औरंगाबाद :  बीड येथून आलेले कॅनाॅन चे सहा प्रिंटर ज्याची किंमत ६६हजार १००रु. आहे. रशीदपुर्‍यात उभ्या असलेल्या मिनी ट्रकमधून लंपास झाल्याचा गुन्हा २९आॅगस्ट रोजी जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. हा प्रकार सीसी टिव्हीत कैद झाल्यानंतर पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनीतांत्रिक पध्दतीने शोध घेत आरोपी निसार अहमद उर्फ सलमान गफार पठाण(२१) रा.संजयनगर याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने रशीदपुर्‍यातील ट्रान्सपोर्ट च्या गाडीतील प्रिंटर चोरल्याची कबुली देत मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केला.वरील कारवाई पीएसआय दत्ता शेळके, गोकुळ ठाकूर,पोलिस कर्मचारी सुनिल जाधव, संतोष बमनात यांनी पार पाडली.

आपलं सरकार