MumbaiNewsUpdate : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईः ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन झाले आहे. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे व मुलगी असा परिवार आहे.

Advertisements

नाटककार आणि लेखक अशी अवीट छाप जयंत यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पाडली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं घेतलेल्या स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. २०१४च्या जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषवले होते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

Advertisements
Advertisements

जयंत पवार यांनी लिहलेली नाटके

अंधातर
काय डेंजर वारा सुटलाय
टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन
दरवेशी
पाऊलखुणा
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक
माझे घर
वंश
शेवटच्या बीभस्ताचे गाणे
होड्या

आपलं सरकार