Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोरोना बिलांच्या लेखापरीक्षणासाठी २ ऑक्टोबरला मुंबईत रुग्ण हक्क परिषदेचा महामोर्चा

Spread the love

पुणे : रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेचा हा ‘माढा पॅटर्न’ राज्यात राबविण्यासाठी महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत लाखो नागरिकांच्या सहभागाने रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने ‘आक्रोश महामोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली आहे.

उमेश चव्हाण यांनी म्हटले आहे कि , लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, नोकऱ्या, व्यवसाय उद्ध्वस्त झालेले असताना लाखो लोकांना चार लाख, पाच लाख, आठ लाख रुपयांची बिले कोरोना वरील उपचारांसाठी कर्ज काढून, दाग – दागिने विकून, पोटाला चिमटा काढून, साठवलेले पैसे या महामारीतील आजारपणासाठी खर्च करावे लागले. मनमानी पद्धतीने कोरोना वरील बिले आकारण्यात आली. शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा किती तरी पटींनी जास्त लाखो रुपयांचा लोकांना भुर्दंड भरावा लागला. या राज्यात लाखो रुपयांची कोरोना रोगावरील उपचारांची बिले आकारलेल्या सर्वच हॉस्पिटलचे दुबार लेखापरीक्षण झाले पाहिजे आणि दोषी आढळलेल्या हॉस्पिटल वर गुन्हा दाखल करून ‘माढा पॅटर्न’ प्रमाणे नागरिकांना तात्काळ त्यांचे लुटीचे जादा घेतलेले पैसे परत दिलेच पाहिजेत.

कोरोनाउपचाराच्या निमित्ताने लोकांचे लूट करून घेतलेले जादाचे पैसे पुन्हा लोकांना परत करावेत हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठीच २ ऑक्टोबर रोजी लाखो लोकांच्या सहभागाने मुंबईमध्ये ‘आक्रोश महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीची बैठक परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पुण्यात झाली.

या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आनंद शेट्ये, कार्यालयीन सचिव संजय जोशी, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख डॉ. सलीम आळतेकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक शैलेश खुंटये, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनील शेजवळ, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय लोहार, कोकण प्रदेशाध्यक्ष सुहास पांचाळ, विदर्भ प्रदेशाध्यक्ष अमोल गीते, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष बाबा चोबे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अहमद बाबा बागवाले, सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष कल्पना पवार, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अपर्णा साठ्ये, पिंपरी-चिंचवड महिला आघाडी अध्यक्ष प्रीती खुंटये, पुणे जिल्हा अध्यक्ष अल्ताफ तारकश, पुणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रकाश तोरणे, परभणी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पुंड, केंद्रीय कार्यालय उपसचिव गिरीश घाग, गणेश भोईटे, रामचंद्र निंबाळकर, गणपतराव फराटे, वनिता पंडित, दौंड तालुका अध्यक्ष कैलास कांबळे उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!