Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : देशात ४५ हजार ८३ नवे कोरोनाबाधित, ४६० जणांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशात ४५ हजार ८३ कोरोनाबाधित आढळले असून ४६० जणांचा मृत्यू झाला आहे. ३५ हजार ८४० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. नवीन रुग्णांसह देशातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ३ कोटी २६ लाख ९५ हजार ३० झाली आहेत. तर मृतांची एकूण संख्या ४ लाख ३७ हजार ८३०वर पोहोचली आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.५३ टक्क्यांवर आहे.

Advertisements

देशात सध्या ३ लाख ६८ हजार ५५८ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. तर आतापर्यंत ३ कोटी १८ लाख ८८ हजार ६४२ जण करोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२८ टक्क्यांवर आहे. गेल्या ६५ दिवसांपासून हा दर तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट देखील गेल्या ३४ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी २.५७ टक्क्यांवर आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान शनिवारी दिवसभरात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ३१ हजार २६५ करोनाबाधित एकट्या केरळ राज्यातील आहेत. तसेच १५३ राज्यात १५३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. .
लसीकरण मोहिमेंतर्गत गेल्या २४ तासांत ७३.८ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंत एकूण ६३.०९ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!