AurangabadCrimeUpdate : सावधान !! तुमच्या पेट्रोलच्या मापात पाप तर नाही ?

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : जगदीश कस्तुरे । औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषतः हायवेवर असणार्‍या पेट्रोलपंपांच्या काही मालकांना हाताशी धरून वाहनधारकांना कमी इंधन देण्यात येत असल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून देणारे निनावी पत्र पोलिसांना मिळाले आहे .

Advertisements

या प्रकारात ज्या पाइपद्वारे पेट्रोल -डिझेल वाहनात भारतात त्या नळीच्या मशीनजवळ रिमोट कंट्रोल लावायचे आणि या सिस्टीम द्वारे निश्चित प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात वाहनधारकांना पेट्रोल -डिझेल द्यायचे अशी शक्कल उत्तरप्रदेशातील तरुण वापरत असल्याचे प्रकार घडत असल्याची माहिती पोलिसांना सदर पत्राद्वारे मिळाली असून पोलीस या प्रकारचा शोध घेत असल्याचे वृत्त आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या लक्षात हि बाब येताच त्यावरून औरंगाबाद ग्रामीण भागात असे उद्योग कोणकोणत्या ठिकाणी घडले व घडत आहेत. याचा तपस पोलीस करीत आहेत. दरम्यान हे उद्योग करणारा इसम हा उत्तर प्रदेशातील माजी सैनिकाचा मुलगा असून तो ग्रामीण भागातील पेट्रोलपंप मालकांशी संपर्क साधून हा प्रकार करीत असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.या शिवाय जालना ग्रामीण, नगर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यातही असे गैर प्रकार घडत असल्याचा संशय पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.या इसमासोबंत आणखी किती साथीदार आहेत. त्यांची काम करण्याची पध्दत काय ? याबाबत पोलिस सर्वांगाने तपास करंत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पेट्रोलपंप मशीनला सेंसरचीप बसवून स्पीड वाढवली जाते.ही चीप बसवल्यानंतर ओळखू येत नाही.मशीन उघडून वरील पत्र्याच्या हँडल अडकवण्याच्या जागेवर ती बसवतात.अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून अधिक तपास चालू आहे.

आपलं सरकार