Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणुकीबाबत राज्यपालांची भेट घेणार : अजित पवार

Spread the love

पुणे : बहुचर्चित प्रलंबित राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणुकीबाबत महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना १ सप्टेंबरला भेटणार आहेत. पुण्यातील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. ८ महिने होऊनही राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीवर काही निर्णय घेतला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज्यपालांना भेटून केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर पत्रकार परिषदेत माहिती दिली. “मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.सगळ्यांच म्हणणं ऐकून घेतले. सगळ्यांचे मत आहे की, ओबीसी आरक्षणबाबत निंर्णय होत नाही. तोपर्यंत निवडणुका घेऊ नये असं सर्वपक्षीय नेत्यांचे मत आहे.,”असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले कि , “पोलिसांनी लगेच कोणती कारवाई केली नव्हती. त्यांचे काही लोकं कोर्टात गेले आणि कोर्टाने नाकारले. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या.”प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या चौघांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणे भाग आहे. प्रत्येकाने जर भान ठेवून वक्तव्य केले असते तर हे प्रसंग आले नसते.”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याबद्दल बोलताना पवार म्हणाले कि , “सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं”, असं टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!