Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ईडीची एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई , ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Spread the love

पुणे : मनी लाँडरिंग प्रकरणात राज्याचे माजी महसूल मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीची एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ईडी’च्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा के लेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’चा तपास सुरू केला होता.

दरम्यान या जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांच्या जावयाचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खडसेंसंदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान हा अहवाल सापडला असून या अहवालात एकनाथ खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!