Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी माजी आमदाराला २५ वर्षाची शिक्षा आणि १५ लाखाचा दंड

Advertisements
Advertisements
Spread the love

शिलाँग : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी री-भोई जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयाने मेघालयचा माजी आमदार ज्युलियस डोरफांगला १५ लाखाच्या दंडासह २५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ज्युलियस डॉरफांग आमदार असतानाची ही घटना आहे. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती फॅब्रोनियस सिल्कम संगमा यांनी हि शिक्षा सुनावली. डोरफांग एचएनएलसी या कट्टरतावादी गटाचा संस्थापक अध्यक्ष देखील आहे.

Advertisements

माजी आमदार ज्युलियस डोरफांग यांने २००७ मध्ये एचएनएलसीचे अध्यक्ष म्हणून शरणागती पत्करून २०१३ मध्ये मावाठी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती. न्यायालयाने १३ ऑगस्ट रोजी डोरफांगला दोषी ठरवत १७ ऑगस्टला त्याला शिक्षा सुनावली. याप्रकरणात न्यायालयाने आणखी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डेरिशा मैरी खारबामोन, मामोनी परवीन आणि तिचा पती संदीप बिस्ववर पीडित तरुणीला गुन्हेगारी क्षेत्रात ओढणे आणि बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Advertisements
Advertisements

डोरफांगला डिसेंबर २०१६ मध्ये पूर्व खासी हिल्स जिल्हा पोलिसांनी राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग (एससीपीसीआर) कडून दाखल तक्रारीच्या आधारावर अटक केली होती. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये एससीपीसीआरनं री-भोई येथे दुसरी तक्रार दाखल केली होती, ज्यात डोरफांगनं जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या तक्रारींच्या आधारे डोरफांगविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. यादरम्यान काही काळ तो बेपत्ताही झाला होता. पण, ७ जानेवारी रोजी शेजारील आसाम राज्यातील एका बस टर्मिनलवरुन त्याला अटक करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!