Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : देशातील रुग्णसंख्या वाढू लागली , ४४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

Spread the love

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ६५८ नवे रुग्ण आढळले असून ४९६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवीन रुग्णांच्या नोंदीसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २६ लाख ३ हजार १८८ झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १८ लाख २१ हजार ४२८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर करोनामुळे एकूण ४ लाख ३६ हजार ८६१ जणांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे.

धक्कादायक म्हणजे देशात गेल्या २४ तासांत आढळलेल्या ४४ हजार ६५८ रुग्णांपैकी तब्बल ३० हजार ७ रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत. तर, ४९६ मृतांपैकी १६२ मृत्यू हे केरळमध्ये झाले आहेत.

गेल्या २४ तासांत ३२ हजार ९८८ रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ९७.६० टक्क्यांवर आहे. देशात सध्या ३ लाख ४४ हजार ८९९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.१० टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ६३ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट २.४५ टक्के असून तो गेल्या ३२ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात ७९ लाख ४८ हजार ४३९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतपर्यंत ६१ कोटी २२ लाख ८ हजार ५४२ जणांचं लसीकरण झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!