Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : उत्साह आवरा , यंदाच्या दसरा , दिवाळीवरही कोरोनाचे सावट

Spread the love

नवी दिल्ली : देशातील सणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचे स्पष्ट करून सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची सूचना करण्यात केली आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा -दिवाळीवर आणि गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने कोरोना नियमांसोबत हे सण साजरे करावे लागणार आहेत. दरम्यान लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हणाले आहे.

 

या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले कि , कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नाही. कोरोना रुग्णसंख्येत नेहमीत सणासुदीनंतर वाढ झाल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणे गरजेचे आहे. लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे”, असेही त्यांनी पुढे सांगितले. केरळमधील करोना स्थितीवरही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. “सध्या देशात रोज येणाऱ्या करोना प्रकरणात केरळमधून ५१ टक्क्याहून अधिक रुग्ण आहेत”, असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

उत्सव काळात गर्दी टाळणे आवश्यक आहे. गर्दीमुळे करोना अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. “सणासुदीच्या काळात अनिवार्य गर्दीच्या ठिकाणी दोन लस घेण्याची अट असावी.”, असे इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या २४ तासांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ही वाढ आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ टक्के आहे. बुधवारी देशात ४६ हजार १६४ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार १५९ जण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर आहे. विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट २.९८ टक्क्यांवर आहे. हा रेट गेल्या ३१ दिवसांपासून तीन टक्क्यापेक्षा खाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!