Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurNewsUpdate : नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योत्सना मेश्राम यांची आत्महत्या

Spread the love

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या 56 वर्षांच्या होत्या. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बेलतरोडी इथल्या फॉर्च्युन श्री अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आत्महत्या केली.

दरम्यान तीन महिन्यांपूर्वी डॉ. ज्योत्सना मेश्राम यांच्या पतीचे निधन झाले होते . पतीच्या निधनानंतर त्या मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे पती सुधीर मेश्राम हे माजी कुलगुरु होते. डॉ. ज्योत्सना मेश्राम अष्टविनायकनगर जयताळा येथे रहात होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या बेलतरोडी इथल्या नातलगांकडे रहायला आल्या होत्या. त्यांना एक मुलगा असून तो अमेरिकेत राहतो. आठ दिवसांपूर्वीच त्या अमेरिकेहून आपल्या मुलाला भेटून परत आल्या होत्या. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरील किचनच्या गॅलरीतून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख असल्याने नॅकची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. नॅक कमिटी दौऱ्यावर येणार होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!