Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraMunicipalElection : महापालिका निवडणुका लढवायच्यात ? मग लागा तयारीला…

Spread the love

मुंबई : राज्यातील महापालिका , नगर पालिका आणि जिल्हापरिषदेच्या आगामी निवडणूक मार्च २०२२ मध्ये घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली असल्याचे वृत्त आहे. राज्यात कोरोनाच्या लाटेमुळे राज्यातील महापालिका आणि नगर पालिकांच्या निवडणूक लांबणीवर पडल्या होत्या. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने राज्यातील जि .प. निवडणूका घोषित केल्या होत्या परंतु ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुकाही कोरोनाच्या कारणावरून स्थगित करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होतील. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही निवडणूक मिनी विधानसभा सारखी असणार आहे. या निवडणुकीत तब्बल अंदाजे ७ कोटी मतदार आपले स्थानिक प्रतिनिधी निवडणार आहे.न्यूज १८ लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.
डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या आणि मार्चमध्ये मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. एकूण १५ महानगरपालिकांच्या निवडणुका होती. या निवडणुकीत एकूण अडीच कोटी मतदार असतील. मुदत संपलेल्या महापालिकांमध्ये नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद महापालिकांचा समावेश आहे.

फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती अकोला आणि नागपूर महापालिकेचा समावेश आहे. त्याचबरोबर ३१० नगरपालिका आणि नगर पंचायत यात १ कोटी २६लाख मतदार असतील. यात १०० नगरपालिकांची मुदत संपली आहे, २१० नगरपालिकांची मुदत फेब्रुवारी संपणार आहे.

याशिवाय सुमारे ३ कोटी ५० लाख मतदार असलेल्या २७ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहे. २७ जिल्हा परिषद आणि ५ जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणूक त्याच बरोबर २९९ पंचायत समितीच्या निवडणूक होतील. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेची मुदत संपली आहे. त्याचबरोबर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम नागपूर या जिल्हा परिषदमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पोटनिवडणूक होणार आहे. तर ठाणे, पालघर वगळून सर्व जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. राज्यातील २०० ग्रामपंचायतच्या निवडणूक याच कालावधीत होईल. त्यामुळे निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आता कामाला लागण्यास हरकत नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!