Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : शेतकरी आंदोलनात तोडगा काढा, सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला इशारा

Spread the love

नवी दिल्ली : नवी कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने वाहतूक कोंडीवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले . अशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाही, यासाठी सरकारला तोडगा काढावा लागेल. शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र वाहतूक कोंडी करू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने यावर दोन आठवड्यात तोडगा काढावा, अशी ताकीद सुप्रीम कोर्टाने दिली आहे. आतापर्यंत सरकारला बराच वेळ मिळाला असून यावर समाधान शोधावे. केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांना सहयोग करावा, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी २० सप्टेंबरला होणार आहे.

 

उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रतिज्ञापत्र दाखल दाखल केले असून या प्रतिज्ञापत्रात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यातील बहुतेक आंदोलक वृद्ध असल्याचंही दाखवून देण्यात आले आहे.दरम्यान शेतकरी आंदोलन आणि रस्ता बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने याचिका दाखल करण्यात आली आहे. नोएडाहून दिल्लीला जाण्यासाठी अर्धा तासाऐवजी दोन लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!