Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : संविधान आमच्यासाठी बायबलसारखे , त्यासाठी आपण जगू किंवा मारू शकतो : न्यायमूर्ती पंकज नकवी

Spread the love

अलाहाबाद : संविधान आमच्यासाठी बायबलसारखं आहे. संविधानासाठी आपण जगू आणि मरू शकतो. लोकांना घटनात्मक मूल्ये आणि धर्मनिरपेक्षतेला धरून राहण्याचा सल्ला देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे पंकज नकवी म्हणाले कि , धर्म ही वैयक्तिक बाब आहे, धर्म घराच्या आत राहिला तर चांगलं आहे. पण रस्त्यावर आला तर तो धर्म नाही. न्यायमूर्ती पंकज नकवी २१ ऑगस्टला निवृत्त झाले. यावेळी त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या भाषणात आपली हि मते मांडली.

न्यायमूर्ती पंकज नकवी म्हणाले कि , “जो पर्यंत तुम्ही एक चांगली व्यक्ती नाही. तोपर्यंत तुम्ही एक चांगला हिंदू किंवा मुस्लिम होऊ शकत नाही. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. ती घराच्या चार भिंतीत बंदिस्त असायला हवी. धर्म रस्त्यावर येताच तो धर्म रहात नाही”. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांनी सांगितलेल्या मूल्यांची आठवण काढली. “माझे वडील मला सांगायचे, मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही. त्याचबरोबर सांगायचे तुम्ही तुमच्या दृष्टीकोनातून धर्मनिरपेक्ष राहिले पाहीजे.”

पंकज नकवी अलाहाबाद उच्च न्याायालयात २०१३ मध्ये न्यायधीश पदावर विराजमान झाले होते. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गेल्या वर्षी लव्ह जिहाद प्रकरणात त्यांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडीचा साथीदार निवडण्याचा अधिकार आहे आणि कायदा दोघांनाही एकत्र राहण्याची परवानगी देतो, असा निर्णय खंडपीठाने दिला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!