Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ElgarParishadUpdate : मोठी बातमी : एल्गार प्रकरणात २२ आरोपींविरुद्ध देशद्रोह आणि देशाविरुद्ध युद्धाच्या षडयंत्राचा आरोप

Spread the love

पुणे : भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी एनआयएने १६ आरोपी आणि सहा फरार आरोपींविरुद्ध राष्ट्रद्रोहाच्या आरोपावरून आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये एनआयएने म्हटले आहे की, एल्गार परिषद आणि माओवादी संघटना यांच्यात संबंध आहेत. आरोपींनी सरकार आणि देशातील नागरिकांच्या विरोधात कट रचून भारताची सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा धोक्यात आणण्याचे काम केल आहे. यांना देशाविरुद्ध युद्ध पुकारून आपले सरकार चालवायचे होते. एनआयएचा हा आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना कमाल शिक्षा मृत्यूदंडापर्यंत शिक्षा दिली जाऊ शकते.

या आरोपपत्रात म्हटले आहे की दहशतवाद विरोधी बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत आठ आणि IPC अंतर्गत आठ आरोप आहेत. एनआयएने म्हटले आहे की, ३१ डिसेंबर २०१७रोजी आयोजित एल्गार परिषदेचा उद्देश दलित आणि इतर जातींच्या सांप्रदायिक भावना भडकावून महाराष्ट्र, भीमा कोरेगाव आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जातीच्या नावावर हिंसा, अस्थिरता आणि अराजक निर्माण करणे हा होता. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करणाऱ्या पुणे पोलिसांनी त्यांच्या प्रस्तावित आरोपपत्रात म्हटले होते की, आरोपींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.

दरम्यान विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना, एनआयएने असेही म्हटले आहे कि , आरोपींनी दहशतवादाचा कट रचण्यासाठी देशातील दोन प्रतिष्ठित संस्था, जेएनयू आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (मुंबई) मधील विद्यार्थ्यांची भरती केली होती. देशाविरुद्ध एक षडयंत्र तयार केले जात होते, ज्यात या विद्यार्थ्यांचा वापर केला जाणार होताएनआयएच्या मते, या प्रकरणात अटक केलेले आरोपी मणिपूरमधील दहशतवादी संघटनांना M4 शस्त्रे आणि 4 लाख राऊंड (काडतुसे) पुरवण्यासाठी 8 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात गुंतले होते. आरोपींना या शस्त्रांद्वारे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला लक्ष्य करायचे होते.

याआधी पुणे पोलिसांनी आयपीसीच्या कलम १२१ आणि १२१-ए अंतर्गत आरोपांचा उल्लेख करत या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले होते. पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, सर्व १६अटक, ‘जे प्रतिबंधित दहशतवादी संघटना/सीपीआय (माओवादी) चे सक्रिय सदस्य आहेत, त्यांनी सरकार (केंद्र आणि राज्य) च्याविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचला आहे. यासाठी सर्वांनी ८कोटी रुपये जमा केले आहेत आणि नेपाळ आणि मणिपूरमधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आयात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी शहरात आयोजित एल्गार परिषद कार्यक्रमाला मोठ्या षडयंत्राचा भाग म्हणून सीपीआय (माओवादी) ने निधी दिला होता. दुसऱ्या दिवशी, १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव लढाईच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले होते. भीमा-कोरेगाव संघर्षानंतर जानेवारीमध्ये राज्यव्यापी बंद दरम्यान पोलिसांनी १६२ लोकांवर ५८ गुन्हे दाखल केले होते. या तपासात असे उघड झाले की, या हिंसाचाराचे नियोजन एक दिवस आधी पुण्याच्या शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेदरम्यान झाले होते. यानंतर हे प्रकरण पुणे पोलिसांमार्फत एनआयएपर्यंत पोहोचले आणि आता केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने या प्रकरणात आपले आरोपपत्र दाखल केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!