Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अफगाणिस्तान -तालिबान प्रश्नावर सरकारची सर्वपक्षीय बैठक

Spread the love

नवी दिल्ली : तालिबान आणि अफगाणिस्तामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ही बैठक होईल. या बैठकीत तालिबानने सत्ता काबीज केलेल्या अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींबाबत परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती द्यावी, असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना माहिती का देत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या हिंदू आणि शीख तसेच अफगाणी नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन भारताने दिले असून भारतीय वायू दलाने अफगाणिस्तानमधील संघर्षजन्य आणि भीतीदायक परिस्थितीत रविवारी १०७ भारतीयांसह आतापर्यंत एकूण १६८ जणांना काबूलमधून बाहेर काढून भारतात आणले.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या अंदाजानुसार, ४०० भारतीय अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अडकले असल्याचे वृत्त असून अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय भारत सरकारने अफगाणिस्तानातून परतलेल्यांना मोफत करोना, पोलिओ लस – ओपीव्ही आणि एफआयपीव्ही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या लोकांचं लसीकरण करण्यात आल्याची  माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

 


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!