Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsLatestUpdate : काबुल विमानतळावरील चेंगराचेंरीत ७ अफगाणी ठार

Spread the love

काबुल विमानतळावरील चेंगराचेंरीत ७ अफगाणी ठार
काबुल : तालिबानने अफगाणिस्तान जिंकल्यानंतर लोकांची भीती वाढतच असून या भीतीपोटी काबुल विमानतळावरील गर्दी कमी होताना दिसत नाही. या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झाले असून तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ब्रिटीश लष्कराने दिली आहे.

“अफगाणिस्तानमधील स्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हातळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे”, असं ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितलं आहे. तालिबानच्या राजवटीनंतर पळून जाण्यासाठी विमानतळ केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे विमानतळावरील स्थिती गंभीर होत चालली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!