Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : सर्वोच्च न्यायालयाच्या गेटबाहेर आत्मदहन करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Spread the love

नवी दिल्ली : १६ ऑगस्ट रोजी एका तरुणाने आणि एका तरुणीने सर्वोच्च न्यायालयाच्या गेटबाहेर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेतील तरुणाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. या घटनेतील पीडित तरुणीनं उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. तर तरुण या प्रकरणात साक्षीदार होता. आरोपांवर सुनावणी न झाल्याची तक्रार करत आपल्या एका मित्रासही पीडित तरुणी सर्वोच्च न्यायालयाबाहेर उपस्थित झाली होती. १६ ऑगस्ट रोजी या दोघांनी फेसबुक लाईव्ह करत स्वत:ला पेटवून घेतलं होतं.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाजवळ उपस्थित असणाऱ्या सुरक्षा यंत्रणेने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत गंभीररित्या जखमी झालेल्या या दोघांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, शनिवारी संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुण – तरुणी दोघंही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. उत्तर प्रदेशातील घोसी मतदारसंघाचे बसपाचे खासदार अतुल राय यांच्यासहीत पोलिसांवर दोन्ही पीडितांनी गंभीर आरोप केले होते. वाराणसीच्या लंका स्टेशनमध्ये १ मे २०१९ रोजी अतुल राय यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राय जिंकून आले होते. बलात्कार प्रकरणात तुरुंगात बंद असलेले बसपा खासदार अतुल राय यांना खासदारपदाची शपथ घेण्यासाठी उच्च न्यायालयानं दोन दिवसांची पॅरोल मंजूर केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!