Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात 4,575 नवीन रुग्णांची नोंद , 5 हजार 914 कोरोनमुक्त , 145 मृत्यू

Spread the love

मुंबई : गेल्या 24 तासात 4,575 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 914 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 27 हजार 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.99टक्के आहे. राज्यात आज 145 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे.

दरम्यान राज्यातील 33 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 53 हजार 967 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जळगाव (42), नंदूरबार (0), धुळे (8), परभणी (16), हिंगोली (77), नांदेड (41), अमरावती (93), अकोला (17), वाशिम (5), बुलढाणा (42), यवतमाळ (11), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (3), गडचिरोली (21) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 558 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.याशिवाय मालेगाव, नंदूरबार, परभणी, नांदेड महानगरपालिका, अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यामध्ये सर्वाधिक 591 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 21,24, 250 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,20, 510 (12.32 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,20,905 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 623 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 281 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,662 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,853 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2023 दिवसांवर गेला आहे.

देशात 24 तासांत 375 रुग्णांचा मृत्यू

दरम्यान भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाली आहे. शनिवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 34 हजार 457 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. अशातच 375 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात 3 लाख 61 हजार 340 सक्रिय रुग्ण आहेत. हा 151 दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे. 11 दिवसांनी मृतांचा आकड्यात घट झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनामुळे आतापर्यंत 4.33 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये काल दिवसभरात 57 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!