Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : व्हायरल व्हिडीओ : अमेरिकन सैनिकांकडे सोपवलेल्या “त्या ” बाळाचे काय झाले ?

Spread the love

काबूल: काबूलच्या विमानतळावर अफगाणिस्तान सोडण्याच्या धामधुमीत एका व्यक्तीने आपल्या बाळाला तारेच्या कुंपणाजवळ अमेरिकन सैनिकाकडे सोपवण्यात आले. हा फोटो, व्हिडिओ व्हायरल झाला होता. या बाळाचा व्हिडीओ जगभर सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे या बाळाचे अखेर पुढे अखेर झाले काय असा प्रश्न विचारला जात होता.

व्हायरल व्हिडिओनुसार काबूल विमानतळावरील १८ फूट उंच भिंतीवर अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आले असताना बचाव मोहिमेदरम्यान या सैनिकांकडून गर्दीवर नियंत्रण ठेवले जात होते. त्याच दरम्यान एका बाळाला सैनिकाकडे सोपवले जात असल्याचा फोटो, व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये विमानतळावर अडकलेल्या लोकांनी तालिबानी अत्याचारापासून आपली मुले सुरक्षित राहावी यासाठी सैनिकांकडे लहान मुले सोपवत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, या फोटोमागील सत्य पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या व्हिडिओचा खुलासा करताना अमेरिकेच्या पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी सांगितले की, त्या बाळाला अमेरिकन सैनिकांच्या ताब्यात देण्यात आले नाही. त्या बाळाच्या पालकांनी अमेरिकन सैनिकांना त्याची देखभाल करण्याची विनंती केली होती. हे बाळ आजारी होते. त्यासाठी जवानाने कुंपणावरून बाळाला ताब्यात घेतले. त्यानंतर विमानतळावर असलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारानंतर बाळाला पुन्हा त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कर्बी म्हणाले की, सैनिकांनी मानवतेच्या भूमिकेतून अफगाण पालकाला मदत केली. अन्य अशाप्रकारच्या कोणत्याही प्रकरणाबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या हे बाळ कुठं आहे, त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत माहिती समोर आली नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!