Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

KabulNewsUpdate : ८५ भारतीयांना घेऊन हवाई दलाचे विमान भारताच्या दिशेने

Spread the love

काबुल : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता तेथून ८५ भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे C-130J विमान भारतात परतत आहे. असे सांगितले जात आहे की विमान इंधनासाठी ताजिकिस्तानमध्ये उतरले होते. हे विमान काबूलहून दिल्लीला येत आहे.

दरम्यान यापूर्वी मंगळवारी सुमारे १४० लोक भारतात परत आले. यामध्ये भारतीय नागरिक, पत्रकार, मुत्सद्दी, दूतावासातील इतर कर्मचारी आणि भारतीय सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता.अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर भारताकडून आपल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये मोठ्या संख्येनं लोक अडकले आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली असून स्पेशल अफगानिस्तान सेल तयार करण्यात आला आहे. १६ ऑगस्टच्या संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाने एक विशेष अफगाणिस्तान सेलची स्थापना केली. ज्याचं उद्दिष्ट अफगाणिस्तानकडून मदतीसाठी आलेल्या विनंतीवर मॉनिटर करणं आहे.या टीममध्ये सुमारे २० तरुण आहेत, जे या मिशनमध्ये २४ तास काम करत आहेत. अफगाणिस्तानातून येणाऱ्या विनंतीचे निरीक्षण करणे . त्यानंतर त्यांच्याशी संबंधित व्यवस्था करणे हे या टीमचं मुख्य काम आहे. या दरम्यान व्हॉट्सअॅप, ई-मेलवरुन काम केले जात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांच्या स्थितीचा आढावा घेतला जात आहे आणि त्यानंतर त्यांच्या अहवालानुसार एक कृती आराखडा तयार केला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!