Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate काबूल विमानतळावर अफ़रातफ़रीचा माहोल , ७ हजार अमेरिकन नागरिकांना केले एअरलिफ्ट

Spread the love

काबूल : अफगाणिस्तान तालिबानांनी कब्जा केल्यानंतर परिस्थिती भयानक आहे. अफगाणिस्तान सोडण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. अशातच एक बातमी समोर आली आहे. देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांवर तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे वृत्त समोर आले आहे.काबूल विमानतळावर जाण्यापासून रोखण्यासाठी तालिबान बंडखोर हवेत गोळीबार करीत आहेत.

दरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गुरुवारी सांगितले की त्यांनी सुमारे ७ हजार लोकांना एअरलिफ्ट केले आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता जगातील अनेक देश आपल्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लोकांकडे आवश्यक कागदपत्रे असूनही, तालिबान त्यांना काबूल विमानतळावर प्रवेश करण्यापासून रोखत असून यामुळे सतत परिस्थिती बिघडत आहे. रेडिओ न्यूझीलंडने एका व्यक्तीच्या हवाल्याने म्हटले आहे कि , हे खूप वाईट आहे. तालिबानकडून हवेत गोळीबार करण्यात येत होता.

अफगाण नागरिकांची निदर्शने

दरम्यान अफगाणिस्तानमध्ये लोक रस्त्यावर उतरुन तालिबानचा निषेध करताना दिसाहेत. लोकं तालिबानच्या विरोधात निदर्शने करताना दिसत आहेत. राजधानी काबूलसह अफगाणिस्तानातील अनेक शहरांमध्ये लोकं निदर्शने करत आहेत. या लोकांना समजावण्यासाठी तालिबान देशातील इमामांचीही मदत घेतानाही दिसत आहेत.

शुक्रवारच्या नमाजच्या वेळी सर्व लोकांना एकत्रित रहायला सांगण्यात यावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. गुरुवारी तालिबानी दहशतवाद्यांनी कुनार प्रांतातील असदाबाद येथे आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केल्याचं वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाल्याचे तेथे उपस्थित असलेल्या लोकांकडून सांगण्यात येत असल्याचेही रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. मात्र लोकांचा जीव गोळीबारात गेला, की चेंगराचेंगरीमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही असेही वृत्तात म्हटले आहे.

 


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!