Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील ६७ पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

Spread the love

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील १,३८० पोलिसांना शुक्रवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील ६७ पोलिसांना गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पदक विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे, उपायुक्त मंजुनाथ सिंगे, एसीपी ज्योत्स्ना रासम, निरिक्षक चिमाजी आढाव, संजय निकुंबे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील ६७ पदक विजेत्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिघांना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये आशुतोष डुंबरे यांच्यासह उपनिरीक्षक अशोक अहिरे, विनोदकुमार तिवारी यांचा समावेश आहे. पोलिस दलातील गुणवत्तापूर्वक सेवेसाठी महाराष्ट्रातील ३९ पोलिसांचा गौरव होणार आहे. उपायुक्त शेखर कुऱ्हाडे, एसीपी सुरेंद्र देशमुख, जोत्स्ना रासम यांच्यासह ललित मिश्रा, मधुकर सावंत, राजेंद्र राऊत, संजय निकुंबे, दत्तात्रय खंडागळे, कल्याणजी घेटे, चिमाजी आढाव, नितीन दळवी, मोतीराम मडवी, उल्हास रोकडे, सुनील तावडे, सुरेश पाटील, हरिश्चंद्र ठोंबरे, संजय सावंत, संतोष जाधव, बाळू कानडे, विष्णू राकडे, पोपट आगवणे, सुभाष बुरडे, विजय भोसले, पॉल अँथोनी, विनोद विचारे, भारत शिंदे, अनंत पाटील, ज्ञानदेव जाधव, सुभाष सावंत, नितीन सावंत, युवराज पवार, दीपक ढोणे, सूर्यकांत गुलभिले, विष्णू पाटील, संतू खिंदे, आनंदा भिलारे, प्रतापकुमार राजन, रशीद शेख यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी गौरविण्यात येणार आहे.

राष्ट्रपती पोलिस शौर्यपदकाचा मान राज्यातील २५ पोलिसांना मिळाला आहे. यामध्ये लिंगनाथ पोर्तेत, मोरेश्वर वेलाडी, बिच्चू सिडाम, श्यामसह कोडपे, नितेश वेलाडी, गोवर्धन कोळेकर, हरी बालाजी, प्रवीण कुलसम, सडवली आसम, योगेश पाटील, सुदर्शन काटकर, रोहिदास निकुरे, आशीष चव्हाण, पंकज हलामी, आदित्य मडावी, रामभाऊ हिचामी, मोगलशाह मडावी, ज्ञानेश्वर गावडे, राजेंद्र तिवारी, विनायक अटकर, ओमप्रकाश जामनिक, मंजुनाथ सिंगे, नवनाथ ढवळे, अरविंद मडावी, शिवा गोर्ले यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!