Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraNewsUpdate : राज्यात ४ हजार ७९७ नवीन रुग्णांची नोंद तर ३ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी परतले

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ४ हजार ७९७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ६१ लाख ८९ हजार ९३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ % एवढे झाले आहे.

दरम्यान आज राज्यात तर १३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९ लाख ५९ हजार ७३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ९२ हजार ६६० रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १२.५४ टक्के जण पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३ लाख ५९ हजार ६४२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण ६४,२१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान मुंबईत गेल्या २४ तासात २६७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत एकूण रुग्ण बरे झालेल्या संख्या ७ लाख १८ हजार ८३ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. सध्या मुंबईत २ हजार ८३४ सक्रिय रुग्ण आहेत.

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत उतार

देशात गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत होते मात्र गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ३७,९२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे २३३७ सक्रिय रुग्णांमधे घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ९२ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार बाधितांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!