Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : …असे काय बोलले आठवले ? कि , विरोधकांच्या गोंधळात आणखी भर पडली !!

Spread the love

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन यावेळी चांगलेच गाजले. बुधवारी तर संसदेचे वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये मोठा वाद झाल्याचे चित्र संबंध देशाने पहिले. यावेळी विरोधकांकडून मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करून संसदेचे अधिवेशनही संस्थगित करण्यात आले.

दरम्यान राज्यसभेत मोठा गोंधळ चालू असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेमध्ये बोलण्याची संधी देण्यात आली असता त्यांनी सादर केलेल्या कवितेमुळेही चांगलाच गदारोळ झाला. आपल्या नेहमीच्या स्टाईल आठवलेंनी १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान एक कविता सादर केली. त्यावेळी आठवले यांनी यमक जुळविण्याचा प्रयत्न करताना ” नंगा ” हा शब्द वापरल्यामुळे विरोधकांनी या शब्दाला तीव्र आक्षेप घेत पिठासीन असलेले डॉ. सस्मित पात्रा यांचे लक्ष वेधून आठवलेंच्या कवितेमधील एक शब्द संसदीय नसल्याचा आरोप केला. त्यावर पात्रा यांनी मी तुमच्या मुद्याची दखल घेतली आहे असं सांगत आठवलेंना त्यांचं बोलणं पूर्ण करण्यास सांगितलं. मात्र आठवलेंनी कविता सादर करताना विरोधी खासदारांनी आराडाओरड सुरु ठेवला. तेव्हा पात्रा यांनी अससंदीय शब्द रेकॉर्डमध्ये घेतला जाणार नाही असं विरोधकांना सांगितलं. त्यानंतरही आठवले बोलताना विरोधक गोंधळ करत होते. अखेर आठवले यांनाही बसण्यास सांगण्यात आले.

आठवले असे काय बोलले ?

आठवलेंनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये यमक जुळवून पंतप्रधान मोदींचं कौतुक केले . या नवीन घटनादुरुस्तीमुळे सर्व मागास वर्गातील जनतेला लाभ होणार असून पुन्हा २०२४ मध्ये मोदीच पंतप्रधान होतील असे या कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी मांडण्याचा प्रयत्न केला. . मात्र या कवितेमध्ये त्यांनी “पंगा” या शब्दाला यमक जोडण्यासाठी वापरलेल्या ” नंगा ” शब्दावर विरोधी पक्षांना आक्षेप घेतला. तसेच हा शब्द रेकॉर्डमधून काढून टाकावा, ही संसदीय भाषा नाही असं म्हणत विरोधकांनी गोंधळ घातला. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे खासदार मात्र या कवितेवर मनसोक्त हसताना दिसत होते.

आठवलेंनी सादर केलेली कविता पुढीलप्रमाणे…

मेरा आज बहुतही आनंदी है मन
क्यो की पास हो रहा है १२७ वा संशोधन

अब खुश हो जाऐंगे एससी, बीसी और ओबीसी जन
वो आ गया है नजदीक क्षण

जो करती है काँग्रेस और विरोधी दलोपर वार
वो है मोदी सरकार
मोदीजी के लिये २०२४ मे खुल जाऐगा सत्ता का द्वार
मोदी हो जाऐंगी प्रधानमंत्री पद पर स्वार

काँग्रेस और विरोधी दलवाले रोज बोल रहे है हाय हाय
लेकिन नरेंद्र मोदी दे रहे है सबको सामाजिक न्याय
२०२४ मे जनता आपको करेगी बाय बाय
फिर हम काँग्रेस को करेंगे हाय हाय

अगर आप रोज करते रहोंगे हाऊस मे दंगा
तो एक दिन कर देंगे हम आपको नंगा
नरेंद्र मोदीजी से मत लो पंगा…

मात्र विरोधकांच्या गोंधळा नंतर नंगा हा शब्द रेकॉर्डवरुन हटवण्यात आल्याची माहिती पिठासीन अध्यक्षांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!