Social Media : ViralNewsUpdate : बचपन का प्यार फेम सहदेवला खरेच कार मिळालीय का ?

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : बचपन का प्यार फेम छत्तीसगडमधील सुकमा येथील सहदेवला एमजीने २३ लाखांची गाडी भेट म्हणून दिल्याचं व्हायरल होत आहे. सहदेवला भेट म्हणून कार देण्यात आल्याचं सांगत काही फोटोही व्हायरल झाले आहेत. मात्र एमजीने सहदेवला २३ लाखांची गाडी भेट दिली नसून एमजी या ब्रिटीश कार निर्माता कंपनीनच्या एका शोरुमने या गाण्यासाठी सहदेवला २१ हजारांचा एक विशेष धनादेश दिला असल्याचे म्हटले आहे. एमजीने सहदेवच्या गाण्याच्या कौशल्यासाठी विशेष कौतुक करत हे बक्षिस दिले आहे.

Advertisements

आपल्या गाण्यामुळे सहदेव रातोरात स्टार झाल्यानंतर बॉलिवूडमधील गायक बादशाहने सहदेवसोबत व्हिडीओ कॉलवरुन चर्चा केली होती. त्याने सहदेवला चंढीगडला भेटीसाठी येण्याचे आमंत्रणही दिले होते . बादशाह सहदेवसोबत लवकरच एक गाणं रेकॉर्ड करणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहे.

Advertisements
Advertisements

विशेष म्हणजे केवळ बॉलिवूडच नाही तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना सुद्धा सहदेवचे हे गाणे आवडले आहे. गेल्या मंगळवारी भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेऊन सहदेवकडून हे गाणं ऐकलं. भूपेश बघेल यांनी स्वत: त्यांचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला होता.

आपलं सरकार