Tokyo Olympic : भारताचा “गोल्डन बॉय” नीरजवर शुभेच्छांचा वर्षाव…

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : भारताचा “गोल्डन बॉय” ठरलेल्या नीरजने सुवर्ण पदक मिळवून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्व स्तरातून नीरजचं अभिनंदन केले जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत नीरजचं अभिनंदन केले आहे.

Advertisements

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे.

Advertisements
Advertisements

भारत १९०० पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अ‍ॅथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ८ रजत आणि १५ कांस्य पदकं पटकावली आहेत.

मी माझे हे सुवर्णपदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो…

पदक जिंकल्यानंतर नीरज म्हणाला, ”मी माझे हे सुवर्णपदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. कदाचित ते मला स्वर्गातून बघत असतील. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला माहीत होते, की आज मी माझे सर्वोत्तम काम करेन. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता.”

नीरज पुढे म्हणाला कि, ”मला पदकासह मिल्खा सिंग यांना भेटायचे होते. त्यांनी हे पदक पीटी उषा आणि त्या खेळाडूंना समर्पित केले जे ऑलिम्पिक पदके जिंकण्याच्या जवळ पोहोचले होते, परंतु यशस्वी होऊ शकले नाहीत. जेव्हा राष्ट्रगीत सुरू होते आणि भारतीय तिरंगा वर जात होता, तेव्हा मी रडणार होतो.”

“छोरे ने कमाल कर दिया..

दरम्यान हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, “छोरे ने कमाल कर दिया.. अपेक्षेनुसार नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळाले आहे. त्यांना आता ठरल्यानुसार ६ कोटी रुपयांचं बक्षीस दिले जाईल. हरयाणामध्ये सेंट्रल फॉर एक्सलन्स अकादमी बनवली जाईल. त्याचं हेड नीरज चोप्राला केले जाईल.”

आपलं सरकार