Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : योग गुरू स्वामी रामदेव हाजीर हो …!! दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

Spread the love

नवी दिल्ली – योग गुरू स्वामी रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीवर केलेल्या वक्तव्यामुळे  त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली आहे. स्वामी रामदेव यांनी कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या पद्धतीवरून डॉक्टरांवर टीका केली होती. यामुळे आता उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना अ‍ॅलोपॅथी आणि अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांविरोधात “चुकीची माहिती पसरवल्या”बद्दल नोटीस बजावली आहे. या प्रकरणी १० ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तक्रारीनंतर पाटणा आणि जयपूर येथे स्वामी रामदेवांविरोधात अनेक एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. यानंतर, आपल्या वक्तव्याचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वामी रामदेव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी कोरोना व्हायरस संक्रमणावरीर उपचारात वापरल्या जाणाऱ्या काही औषधांवर प्रश्न उपस्थित केल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत बाबा रामदेव, “कोविड-१९ साठी अ‍ॅलोपॅथिक औषधी घेतल्यानंतर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे,” असे म्हणताना ऐकू येत होते.

दरम्यान  इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने मे महिन्यात बाबा रामदेव यांना १००० कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली होती. यात, बाबा रामदेव यांनी १५ दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे १००० कोटी रुपयांची मागणी केली जाईल. याच बरोबर रामदेव यांना ७२ तासांच्या आत कोरोनिल किटची दिशाभूल करणारी जाहिरातही सर्व ठिकाणांहून हटविण्यास सांगण्यात आले होते. कोरोनिल कोविड व्हॅक्सीननंतर होणाऱ्या साइड इफेक्ट्सवर प्रभावी असल्याचा दावा, या जाहिरातीत करण्यात आला होता. रामदेवांच्या या वक्तव्यावर  तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही, रामदेवांचे हे वक्तव्य “अत्यंत दुर्दैवी” असल्याचे म्हणत, ते वापस घ्यायला सांगितले होते. तत्पूर्वी,

आपलं सरकार

Click to listen highlighted text!