Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : दिवभरात ७ हजार २४२ नवे कोरोनाबाधित , दिवसभरात राज्यात १९० मृत्यू

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ११ हजार १२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ६० लाख ७५ हजार ८८८ झाला आहे. यासोबतच राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९६.५९ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून आरोग्य विभागासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.


एकीकडे कोरोनावर मात करून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला असताना नव्या कोरोनाबाधितांचा आकडा देखील सातत्याने कमी राहिला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार २४२ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ६२ लाख ९० हजार १५६ इतका झाला आहे. त्यापैकी ७८ हजार ५६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्याचा मृत्यूदर गेल्या काही दिवसांमध्ये २.४ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आज दिवसभरात राज्यात १९० कोरोना मृत्यूची नोंद झाली असून आत्तापर्यंत राज्यात १ लाख ३२ हजार ३३५ कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असे ते म्हणाले. उरलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. किंबहुना, तिथे रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असे राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!