CoronaMaharashtraUpdate : कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई :  राज्यात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोविडवरील लसचे दोन्ही डोस देण्यात आले असून एक कोटीहून अधिक नागरिकांना लसचे दोन्ही डोस देणार महाराष्ट्र हे देशातील पहिले विक्रमी राज्य ठरले आहे. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे.

Advertisements

आतापर्यंत राज्यातील तीन कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.राज्यात आज सुमारे ४१०० लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी ४ वाजेपर्यंत तीन लाख ७५ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

दरम्यान कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे करोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत नागरिकांचं आणि प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे.

आपलं सरकार