MaharashtraRainUpdate : पूरग्रस्तांना मदत देताना तांत्रिक अडचणी येणार नाहीत : मुख्यमंत्री

Advertisements
Advertisements
Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमध्ये दाखल झाले. चिपळूण व खेडमध्ये पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत ” काहीही  करा पण आम्हाला उभं करा “, अशी मागणी केली तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी देखील या महिलेचे  म्हणणे ऐकून घेत, तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.


चिपळूण : सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं आहे.

Advertisements

चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली व यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. मदत पुरवठ्यात तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ दिले जाणार नाही. त्याही बाबत मी सूचना दिलेल्या आहेत. ज्यांनी विम्याचं कवच घेतलेलं असेल, त्यांची एक वर्गवारी करा आणि ज्यांनी विमा घेतलेला नाही, त्यांची वेगळी वर्गवारी करा. तांत्रिक बाबींची अडचण येणार नाही, याची खबरदारी सरकार घेईल.” असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

Advertisements
Advertisements

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ”मी एवढच सांगतो आहे की, सुरूवातीला आम्ही तातडीची मदत करतच आहोत, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. काही ठिकाणी रस्ते, पूल देखील वाहून गेले आहेत, मोठं नुकसान झालं आहे. पिकाचं नुकसान झालेलं आहे आणखी काही नुकसान झालं असेल, या सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन, आपण जे करता येणं शक्य आहे व जे करणं आवश्यक आहे ते सर्व करू.”

याचबरोबर  ही वारंवार येणारी संकटाची मालिका आणि संकटं ही बघितल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ सारखी, एनडीआरफच्या टीमची तर आपण मागणी करणारच आहोत, पण एनडीआरएफ सारखी आली एसडीआरएफ आहेच, पण त्यात आणखी एक भर घालण्याच निर्णय आम्ही घेतलेला आहे. की जेणेकरून जी बाहेरून टीम येईपर्यंत, इथली टीम जी स्थानिक असेल ती काम सुरू करेल.” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपलं सरकार